प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या गुप्तांगावर काठीने मारुन तुला वड्यात टाकतो अशी धमकी दिल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.पी.एफ.सय्यदसो यांनी आरोपी प्रविण शिवाजी करवळ (वय 34.रा.राजीव गांधी वसाहत,मार्केट यार्ड) याला एक वर्षे तीन महिने सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे . या खटल्यात सरकारी वकील सौ.अमिता ए.कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.
यातील फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात रहात असून आरोपी याने दि.06/06/2023 रोजी रात्री आठच्या सुमारास पीडीत मुलगी आणि इतर लहान मुले खेळत असलेल्या ठिकाणी येऊन पीडीत मुलीच्या हाताच्या मनगटाला घट्ट पकडून आणि तिचे तोंड दाबून त्या परिसरात असलेल्या एका मंदीरच्या पाठीमागे नेऊन पीडीतेला मिठ्ठी मारुन तिच्या गुप्तांगावर काठीने मारुन तुला वड्यात टाकतो अशी धमकी दिल्याने आरोपीवर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.शाहुपुरी पोलिसांनी त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.पी.एफ.सय्यदसो ,यांच्या कोर्टात चालले.सरकारी वकील सौ.अमिता ए.कुलकर्णी यांनी आठ साक्षीदार तपासले समोर आलेले पुरावे ,फिर्यादी आणि पीडीत मुलीने दिलेली साक्ष आणि सरकारी वकील यांनी केलेला जोरदार युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य मानुन न्यायाधीश मा.सय्यदसो यांनी आरोपी प्रविण करवळ याला एक वर्षे तीन महिने सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या कामी विशेष सरकारी वकील सौ.अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले असून याचा तपास शाहुपुरी पोलिस ठाण्याच्या उपनिरिक्षक श्रीमती श्वेता पाटील यांनी केला असून या कामी कोर्ट पैरवी पोहेकॉ.शंकर माने यांनी सहकार्य केले.