प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने 14 लाख 28 हजार 600 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. मद्याची किंमत 9 लाख 78 हजार 600 रुपये असल्याची माहिती कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक एस.एम. मस्करे यांनी दिली आहे*.
कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला राधानगर - कोल्हापूर मार्गावरून मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. या पथकाने कोल्हापूर-राधानगरी रोड, क्रशर चोक, इरानी खान रंकाळा तलाव जवळ, कोल्हापूर शहर येथे सापळा लावून पाळत ठेवली असता रविवार (10) रोजी सकाळी साडे सातच्य सुमारास एक संशयित इसम चारचाकी महिंद्रा कंपनीची जेनिओ गाडी नं. (MH-07-P-4755 )येत असलेली दिसली. या वाहनास थांबवून वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील हौदामध्ये गोवा राज्यात तयार झालेले मद्य आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्य व बिअर ने भरलेले कागदी पुठ्याचे विविध कंपनीचे 180मिली ,500 मिली.आणि 750 मिली.असे एकुण 151 बॉक्स आढळून आले.
या प्रकरणी वाहन चालक प्रसाद महादेव नराम (वय 51, रा. घर नं-११८४, मु.पो. फोंडाघाट, हवेली नगर, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) याला अटक केली. गोवा राज्यात तयार झालेले मद्य आणि महाराष्ट्रात बंदी असलेले विदेशी मद्य असा बिअर चा मद्यसाठा आढळून आला आहे. जप्त केलेल्या वाहनासह मद्याची एकूण किंमत 14 लाख 28 हजार 600 रुपयांची असून मद्याची किंमत 9 लाख 78 हजार 600 रुपये इतकी आहे. या गुन्ह्यामध्ये आणि कुणी साथीदार आहेत का. तसेच हे मद्य कोठे पुरवठा करणार होते.याचा तपास सुरु आहे. या गुन्ह्यातील आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे, दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे, सहायक दुय्यम निरीक्षक कांचन सरगर व जवान विलास पवार, विशाल भोई, सचिन लोंढे, धीरज पांढरे, प्रसाद माळी, साजिद मुल्ला यांनी केली.याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे हे करत आहेत.