प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - पत्नीकडे का पहातोस म्हणुन केलेल्या मारहाणीत आशिष मारुती चौगुले (वय 25.रा.नंदगाव ,ता.करवीर ) याला लोखंडी रॉडने त्याच्या हातावर ,पाठीवर जबर मारहाण करून जखमी केले असून त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील जखमीला तेथील रहात असलेल्या महिलेने आणि तिच्या पतीसह त्याच्या मित्राने आशिष याला सोमवार (दि.25) रोजी रात्री नऊच्या सुमारास द.वडगाव येथील हॉटेल सम्राटच्या पुढ़ील बाजूस नंदगाव येथे घरातुन बोलावून घेऊन लोखंडी रॉडने आणि पाइपने त्याच्या पाठीवर ,हातावर आणि पायावर मारुन गंभीर जखमी केले.त्याच प्रमाणे त्याच्या मित्राला ही मारहाण करण्यात आली.अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. याची फिर्याद इस्पुर्ली पोलिस ठाण्यात दिली असून दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मोहन चव्हाण आणि चंदन कंदलगावे (दोघे रा.नंदगाव ) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.