'दाना' चक्रीवादळाचं रौद्ररूप, चार राज्यांना हाय अलर्ट, 500 ट्रेन रद्द तर 300 विमानांची उड्डाणेही थांबवली

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

'दाना' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने भारतातील अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये जाणवणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, बंगाल आणि ओडिशामध्ये आज 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर रोजी हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यावेळी, या राज्यांमध्ये वादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो.

वादळामुळे एकूण 552 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत भुवनेश्वर आणि कोलकाता येथे दक्षिण पूर्व रेल्वेने 150 गाड्या रद्द केल्या आहेत, ईस्ट कोस्ट रेल्वेने 198 ट्रेन्स रद्द केल्या आहेत, ईस्टर्न रेल्वेने 190 ट्रेन्स रद्द केल्या आहेत आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने 14 ट्रेन्स रद्द केल्या आहेत. अशा परिस्थितीत आतापर्यंत एकूण 552 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फक्त 300 उड्डाणे रद्द करण्यात आलेले आहेत. याशिवाय, ओडिशातील सुमारे 14 जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेशही जारी करण्यात आले असून, टूरिझम पार्क, ओडिशा हायकोर्ट 25 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एनडीआरएफ आणि अग्निशमन दल तैनात

'दाना' चक्रीवादळातून लोकांना इतर ठिकाणी हलवण्यासाठी आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी ओडिशाने राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF), ओडिशा आपत्ती निवारण दल (ODRF) आणि सुमारे 288 टीम नियुक्त केल्या आहेत. अग्निशमन दल आधीच तैनात करण्यात आले आहे. या संदर्भात ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनीही आज उच्चस्तरीय बैठक घेतली, ज्यामध्ये त्यांनी वादळाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post