प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
डेंग्यू सदृश आजाराने नेरळ येथील एका २५ वर्षीय उच्चशिक्षित व ऍडव्हॉकेट सनद प्राप्त तरुण मुस्तफा उर्फ राजू रफिक अत्तार यांचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली असताना, त्याच भागासह इतर भागातील आणखी पाच जणांना डेंग्यू सदृश्य आजाराची लागन झाल्याची बाब समोर आली आहे.
तर डेंग्यूच्या डासांची वाढती उत्पत्ती संपुष्ठात आणण्यासाठी नेरळ ग्रामपंचायत स्तरावरून औषध फवारणी व धुरळा सुरू केली आहे. तर नेरळाची मोठी असलेली व्यापती पाहाता नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी अधिकच्या औषध फवारणी व धुरळा फवारणी यंत्राच्या मदती संदर्भात पत्रकोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच यांना औषध फवारणी व धुरळा फवारणी यंत्राच्या मदती संदर्भात पत्र देताच सरपंच महेश विरले हे त्यांच्या टीमसह औषध फवारणी व धुरळा फवारणी यंत्रासह तत्परतेने आरोग्याप्रति नेरळ ग्रामपंचायतीच्या मदतीला धावुन आले
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जुनी बाजारपेठ येथील राहणारे नामांकित व्यक्ती रफिक अत्तार यांचा २५ वर्षीय मुलगा मुस्तफा उर्फ राजू रफिक अत्तार याचा डेंग्यु सदृश आजाराने दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, बोंबीलआळी येथील जावेद जळगावकर यांना ताप आल्याने त्याची रक्त तपासणी केली असता, डेंग्यूची लागन झाल्याचे निष्पन्न झाले असुन, त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारानंतर ते बरे झाल्याचे तर नंतर त्यांचा मुलागा कुशीयान जावेद वय वर्ष २२ याला ताप आल्याने त्याची रक्त तपासनी मध्ये ही डेंग्यूचे निदान , तर नेरळ मधील सेवालाल धोबी ( इस्त्रीवाला ), नेरळ टेपआळी येथील योगेश मोरे वय वर्ष २४ , व जुनी बाजारपेठेतील निकुंज विपीनचंद्र शहा वय वर्ष ३२ डेंग्यू आजारानी बाधीत असल्याचे, व सदर विभागातील एकूण ९४ घरे प्रमाणे ५२० जणांनचे सर्वेक्षण करण्यात आल्याचे व त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणी करीता पाठवण्यात आल्याची माहिती सह डेंग्यूच्या डासांचा प्रतिबंधक करण्या संदर्भात औषध फवारणी व धुरळा फवारणी करण्याच्या सुचना या नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून नेरळ ग्रामपंचायतीला देण्यात आल्या प्रमाणे नेरळ ग्रामपंचायतीने आपल्या कार्यालयातील औषध फवारणी व धुरळा फवारणी यंत्राव्दारे फवारणी सुरू केली परंतू नेरळ ग्रामपंचायतीची वाढती व्याप्ती व डेंग्यू सदृश रूग्णांची वाढती संख्या पाहाता नेरळ मधील सर्व परिसर लवकरात लवकर औषध फवारणी व धुरळा फवारणी करून, डेंग्यूच्या डासांचा प्रतिबंधक करण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कार्ले यांनी कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांना मदतीसाठीचे पत्र देताच. नागरिकांच्या आरोग्या प्रती कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांनी कोल्हारे ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांच्या सह औषध फवारणी व धुरळा फवारणी यंत्रासह नेरळ ग्रामपंचायतीच्या मदतीला तात्परतेने सहकार्याच्या भूमिकेतून हजर झाले. तर औषध फवारणी व धुरळा फवारणी यंत्राला लागणारे डेंग्यू नाशक औषध, डिजल व पेट्रोल तसेच कोल्हारे ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांच्या जेवणचा सर्व खर्च हा कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांनी स्वखर्चातून केल्याची माहिती समोर येत आहे.
प्रतिक्रिया .....
सदर औषध फवारणी व धुरळा फवारणी ही राजेंद्र गुरुनगर, कुंभारआळी, बोंबिलआळी तसेच जुनी बाजारपेठ मध्ये करण्यात आली असुन, नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील सर्व विभागातील फवारणी पूर्ण होई पर्यंत सुरू राहिल.
महेश विरले, कोल्हारे ग्रामपंचायत,
नेरळ ग्रामपंचायतीची वाढती व्याप्ती व त्यामध्येच नेरळ भागात डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने, व नेरळ प्राथमिक आरोग्य विभागाकडी डेंग्यूच्या डासांचा प्रतिबंधक करण्याच्या सुचना व डेंग्यूच्या डासांचा नायनाट करण्यासाठीचे नेरळ ग्रामपंचायती समोर असलेले अहवान, व ते पूर्ण करण्यासाठी मदतीसाठी कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांना पत्राव्दारे केलेली मागणी व ते मदतीसाठी आपल्या टीमसह औषध फवारणी व धुरळा फवारणी यंत्रासह हजर झाल्याने नेरळ मधील डेंग्यूच्या डासांचा नायनाट करण्याप्रती सरपंच महेश विरले यांचे लाभले सहकार्याचे अभिनंदन,