मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सायन- पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. ३ च्या मुंबई-पुणे उत्तरवाहिनी मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले

 


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

रेवस-रेडी (सिंधुदुर्ग)  सागरी महामार्गावरील  ७ खाडी पुलांच्या कामांचे भुमिपूजन देखील यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले.सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. ३ चे लोकार्पण

 प्रत्येकी ३ मार्गिकेचे २ पूल बांधण्यात येणार.  

(मुंबईहून पुण्याकडे जाणारी उत्तर वाहिनी काम पूर्ण व पुण्याहून मुंबईकडे जाणारी दक्षिण वाहिनी काम प्रगतीपथावर)

प्रकल्पाची एकूण किंमत : रु. ५५९ कोटी.

पुलाची लांबी : ३१८० मी.

सद्यस्थितीत उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण करुन ती वाहतुकीस खुली करण्यात येत आहे.

रेवस ते रेडी (सिंधुदुर्ग) या सागरी महामार्गावरील ७ पुलांच्या कामाचे भूमिपूजन

 रेवस ते रेडी (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गाची एकूण लांबी : ४९८ किमी.

पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा महामार्ग, कोकण किनारपट्टीवरील सर्व सागरी किनारे यांना गतिमान महामार्गाने जोडणारा प्रकल्प.

 सर्व ७ पुलांची एकूण लांबी २६.७० कि.मी. आणि एकूण  प्रशासकीय मान्यता रु. ७८५१ कोटी इतकी आहे.

रेवस- कांरजा भागातील धरमतर खाडीवरील पूल :

एकूण लांबी : १०.२० किमी.

प्रशासकीय मान्यता : रु. ३०५७ कोटी

पुलाचा प्रकार : स्टिल ब्रिज (लोखंडी पुल)

 कामाची मुदत : ३ वर्ष - २०२७ मध्ये पूर्ण होईल.


दिघी आगरदांडा भागातील आगरदांडा खाडीवरील पूल

 एकूण लांबी : ४.३१ किमी.

 प्रशासकीय मान्यता रक्कम : १३१५ कोटी.

 पुलाचा प्रकार: केबल स्टे

कामाची मुदत : ३ वर्ष

केळशी भागातील केळशी खाडीवरील पूल 

 एकूण लांबी : ६७० मी.

प्रशासकीय मान्यता रक्कम रु. १४८ कोटी

पुलाचा प्रकार: बॉक्स गर्डर कामाची मुदत : ३ वर्ष

कुणकेश्वर येथील पुलाचे बांधकाम*

एकूण लांबी : १५८० मी.

प्रशासकीय मान्यता रक्कम रु. २५७ कोटी

 पुलाचा प्रकार: केबल स्टे

रेवदांडा- साळाव भागातील कुंडलिका खाडीवरील पूल :*

एकूण लांबी : ३.८२ किमी.

प्रशासकीय मान्यता रक्कम : १७३६ कोटी

पुलाचा प्रकार : केबल स्टे

कामाची मुदत : ३ वर्ष

बागमांडला वेश्वी भागातील बाणकोट खाडीवरील पूल:

● एकूण लांबी : १.७११ किमी.

● प्रशासकीय मान्यता : रक्कम रु. ४०८ कोटी

● पुलाचा प्रकार : केबल स्टे

● कामाची मुदत : ३ वर्ष

जयगड खाडीवरील पूल*

● एकूण लांबी : ४.४० कि.मी.

● प्रशासकीय मान्यता- रक्कम रु. ९३० कोटी

● पुलाचा प्रकार: केबल स्टे

● कामाची मुदत : ३ वर्ष

Post a Comment

Previous Post Next Post