राजकीय पक्षाची उमेदवारी आणि चिन्हासाठी महत्त्वाचा असलेला 'एबी' फॉर्म म्हणजे काय ? हे जाणून घेऊ यात.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोणतीही निवडणूक लागली की 'एबी' फॉर्मचा विषय नेहमी चर्चेत येतो. एखाद्या उमेदवाराने 'एबी' फॉर्म पळवला, फाडला येथेपासून ते चुकीचा भरल्याने उमेदवारी रद्द झाली, अशा बातम्या सतत आपल्या कानावर येत असतात. तसंच, 'एबी' फॉर्म मिळवण्यासाठी हाणामारीच्या घटनाही अनेक ठिकाणी घडल्याचा इतिहास आहे.


काय आहे 'ए' फॉर्म

  • निवडणुकांमध्ये हे पक्ष त्यांचे अधिकृत म्हणून काही उमेदवार रिंगणात उतरवितात.
  • त्यांना एबी फॉर्म' हा पक्ष आणि त्या पक्षाचे अधिकृत चिन्हं मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे.
  • ए फॉर्म' हा त्या पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा अधिकृत दस्तावेज आहे.
  • ए फॉर्म'वर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते.
  • संबंधित राजकीय पक्षाकडून 'ए' फॉर्म दिला जातो.
  • त्यात उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, याची माहिती द्यावी लागते.
  • उमेदवारी अर्ज भरताना अनेक कागदपत्रं, प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावी लागतात.
  • काहीवेळा अधिकृत उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या, तर अर्ज बाद ठरू शकतो.
  • त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडतो.

काय आहे 'बी' फॉर्म

  • 'बी' फॉर्म हा अधिकृत उमेदवारासंदर्भातील दस्तावेज आहे.
  • 'बी' फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सूचवलेल्या आणखी एका उमेदवाराचे नाव असते.
  • काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर दुसऱ्याला निवडणूक आयोग अधिकृत करु शकतो.
  • राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकीसाठी हे फॉर्म 'एए' आणि 'बीबी' म्हणून ओळखले जातात.

Post a Comment

Previous Post Next Post