प्रेस नोट प्रसिद्धीकरता
प्रति
संपादक
प्रेस मीडिया लाईव्ह :
आम आदमी पार्टीच्या वतीने महाराष्ट्र विधानसभेच्या पुणे शहरातील आठही जागांवर उमेदवार देण्यासाठी पार्टी सज्ज असल्याचे आज अधिकृतरित्या पक्षाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 2019 ला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर प्रचंड खाली गेला आहे. सर्वसामान्य जनतेच्या समस्या मात्र प्रस्थापित पक्ष सोडवू शकलेले नाहीत. निवडणुकांमध्ये जनतेला एका प्रामाणिक पार्टीचा पर्याय मिळावा या हेतूने आम आदमी पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून शहरातील सर्व आठही जागा आम आदमी पक्ष जिंकेल असा विश्वास यावेळी पार्टीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
आम आदमी पार्टीच्या वतीने सांगण्यात आले की, यंदाच्या निवडणुकीत पार्टीच्या वतीने उच्चशिक्षित आणि चांगल्या चारित्र्याचे उमेदवार दिले जाणार असून इच्छुक उमेदवारांना शहरातील प्रश्नांची आणि समस्यांची चांगली जाण आहे तसेच सर्व इच्छुक उमेदवारांनी मागील पाच वर्षांपासून विविध आंदोलनाच्या आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. जनतेतूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळत असून त्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. प्रस्थापितांकडून झालेल्या निराशेमुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला असून ते एका नव्या पर्यायाचा शोध घेत आहेत. हा पर्याय त्यांना आम आदमी पार्टीच्या स्वरूपात उपलब्ध असून पार्टीच्या कार्यकर्त्यांना जर संधी मिळाली तर भ्रष्टाचार रहित सुशासन कसे केले जाते याचे उत्तम उदाहरण पार्टीच्या वतीने दाखवून दिले जाईल.
महाराष्ट्रात सत्तानाट्य, कोयता गॅंग,महिला अत्याचार, युवा बेरोजगार, शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत. महायुती सरकार फक्त जातिधर्म वाद आणि भ्रष्टाचारात तल्लीन आहे. तसेच सुसंस्कृत पुणे शहराला गुंडांचे शहर म्हणून नव्याने ओळख मिळाली आहे. आम आदमी मात्र आजही पुणे शहरात रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा, ट्रॅफिक समस्या मध्ये अडकलेला आहे.
धनंजय बेनकर पुणे शहर अध्यक्ष
महापुरुषांचा अपमान करणारे व गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे वाचाळवीर आमदार चंद्रकांत पाटील म्हणजे सुसंस्कृत कोथरुडला लागलेले ग्रहण आहे. हे ग्रहण येत्या निवडणुकीमध्ये कोथरूडकरांनी सोडवावे.
अभिजीत मोरे, राज्य सचिव
आम्ही पुणे शहराला परत शिक्षणाचे माहेर घर, सुसंकृत, नागरी सुविधायुक्त शहर बनवण्यासाठी शहरातील 8 विधानसभा निवडणुका पूर्ण ताकतीने लढणार आहोत. पुणे कर आम्हाला साथ देतील हा पूर्ण विश्वास आहे.
किरण कद्रे ,प्रवक्ते पुणे शहर
शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्ष बांधणी झालेली असून येत्या निवडणुकीत जास्तीत जास्त प्रमाणात मतदार आम आदमी पार्टीकडे वळतील असा विश्वास यावेळी पक्षाचे युवा शहराध्यक्ष अमित म्हस्के यांनी यावेळी बोलून दाखवला. पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे गेल्या पाच वर्षात जे प्रयत्न केले आहेत त्याचे फळ येत्या निवडणुकीत नक्कीच पार्टीला मिळेल असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषद उपस्थित
सतीश यादव, सुरेखा भोसले निरंजन अडागळे ,निलेश वांजळे, प्रशांत कांबळे, रुबीना काजमी , अक्षय शिंदे, संजय कोणे प्रीती निकाळजे, ॲड.प्रदीप माने
आम आदमी पार्टी
मीडिया टीम