महापूर, दलित अत्याचार, अतिक्रमण नियमितीकरणासाठी यड्रावकरांनी किती मेळावे घेतले ?

 जनतेला विचारण्याचे नाटक निवडणूकीच्या तोंडावरच का? विरोधकांकडून विचारला जातोय सवाल

प्रेस मीडिया लाईव्ह :

 शिरोळ ( दै अप्रतिम) : 

         गेल्या पाच वर्षात शिरोळ तालुक्यात तीन वेळा महापूर आला, शेतकरी, कष्टकऱ्यांसह तालुक्याचे प्रचंड नुकसान झाले, यड्रावकरांच्या कार्यकर्त्यांनी दलितांवर प्रचंड अत्याचार केले, यड्रावकरांच्या सांगण्यावरून अनेक वेळा दलितांवर ठरवून अत्याचार केले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागणीसाठी जमलेल्या जनसमुदायावर प्रचंड लाठीचार्ज झाला, पाच वर्षात शिरोळ तालुक्यातील एकही अतिक्रमण नियमीत झाले नाही, शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळाला नाही मात्र ़ा सर्व संकटाच्या वेळी यड्रावकरांनी कधीही जनतेचा मेळावा घेतला नाही, राज्यात सत्ताबदल करण्यापुर्वी किंवा त्यानंतरही कधीच मेळावा घेतला नाही मात्र आत्ता निवडणूकीच्या तोंडावर यड्रावकरांना जनता आठवत आहे का? असा सवाल सध्या विरोधकांकडून उपस्थित होताना दिसत असून यड्रावकरांनी यापुर्वी मेळावे का घेतले नाहीत याचे उत्तर देण्याची मागणी होत आहे. 

          तालुक्याच्या आमदार पदावर बसलेला व्यक्ती हा वाद सोडवणारा असावा अशी सामान्यांची अपेक्षा असते मात्र यड्रावकरांनी अनेकदा स्वत: वाद निर्माण केले आहेत. जयसिंगपूरातील दलित महिलेचे घर फक्त कोण विचारणार नाही म्हणून बुलडोझर लावून पाडले आहे. ़यामुळे त्यावेळी जर एखादा मेळावा घेतला असता तर कार्यकर्त्यांच्यावर बंधने आली असती, त्यांना दलितांवर अत्याचार करायचा नसतो, तो समाज गेल्या अनेक शकतांपासून मुख्य प्रवाहापासून बाजूला असून मजूरी करून जगणाऱ्या या कमकूवत वर्गावर अन्याय करायचा नसतो हे तरी समजले असते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर यड्रावकरांकडून काहीही निर्णय घेण्यात आला तरी त्यातून तालुक्यातील गरीबांच्यावर झालेले अन्याय भरून निघणार आहेत का? याचे उत्तर तरी यड्रावकर देणार का? असाही सवाल उपस्थित होताना दिसत आहे

Post a Comment

Previous Post Next Post