संपादकीय :
राजकीय क्षेत्रात मुस्लिम समाजाचा फक्त वापरच! प्रत्येक निवडपणुकीत मुस्लिम समाज इमानदारीने मतदान करतो मात्र मुस्लिम समाज बांधवावर किंवा नेत्यावर नेहमीच अन्याय होत आला असून त्यांना सत्तेत भागीदारी करून घेत नाहीत..
पुणे : मुस्लिमांचा वापर फक्त मतांसाठी करू नका त्यांना सत्तेत भागीदारी देण्यात यावी केवळ आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी मुस्लिमांचा वापर करण्यात येऊ नये. या साठी मुस्लिमांनी सुद्धा आपल्या न्याय हक्कासाठी लढणे गरजेचे आहे. महाआघाडीतील नेते मुस्लिमांचा फक्त मतांसाठी वापर करून घेतात मात्र सत्तेत मुस्लिमांना भागीदारी देत नाही हे दुर्दैवी आहे असे ज्येष्ट पत्रकार मेहबूब सर्जेखान यांनी खंत व्यक्त केली आहे . नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुसलमानांनी भरभरून मतदान दिले. महाराष्ट्रात एकूण 48 पैकी एकही उमेदवार लोकसभेत दिले नाही. मोदी सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जितका मतदान मुस्लिमांनी केला व मुस्लिम समाजाची यावेळी मतदानाची टक्केवारी ही लक्षणीय वाढ झाली होती. मुस्लिमांचा ते योगदान आघाडी सरकारने विसरता कामा नये. त्याची भरपाई येणाऱ्या काळात आघाडीतील घटक पक्षाने करणे गरजेचे आहे.
मात्र या लढाईत महाआघाडीचे घटक पक्ष कमी पडल्याचे दिसून येते त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारांना पाडण्याचा काम केले मुस्लिम समाजाने यावेळी वंचित बहुजन आघाडी व एमआयएम पक्ष पर्याय असताना सुद्धा त्यांना पसंती न देत महाविकास आघाडीला प्रथम पसंती दिली असे असताना सुद्धा नुकताच विधान परिषदेचे दोन जागा मुस्लिमांचे रिकाम्या झाल्या त्याही ठिकाणी मुस्लिमांना संधी देण्यात आली नाही यावरून असे सिद्ध होते की महाविकास आघाडी फक्त मुस्लिमांचा मतांसाठी वापर करून घेते मात्र सत्तेत भागीदारी देत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांनी ताकतीने आपले उमेदवार उभा करून स्वतःच्या बळावर व इतर समाजाचा साथ सहयोग घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावा आणि आपली ताकत दाखवावी लागेल या सर्व बाबींचा विचार करता मतदारांचा प्रवाह भविष्यात बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.