प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील :
आज दिनांक 30/10/2024 रोजी श्री राजू कुरेशी मु. बालसई ता. रोहा जि. रायगड यांनी आज मंत्रालय मुंबई येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मंत्रालयातील कार्यतत्पर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे आत्मदहनाचा अनर्थ टळला .
या बाबत ची सविस्तर माहिती अशी की गोडसई आंबा काळवा मध्ये कोलाड पाटबंधारे येतील कार्यकारी अभियंता पवार, अंगावणे आनि महामुनी यांनी संगणमत करून आर्थिक देवाण घेवाण करून आंबा कालवा मध्ये शेतीसाठी काळव्यामधून रस्ता बनवण्याची परवानगी दिली मात्र त्या ठिकाणी शेती नसून RMC प्लांट साठी भ्रष्टाचार करून कळव्यामधून रस्त्याची बेकायदेशीर परवानगी दिली आहे, सदर कळव्याच्यावर 50 वर्ष जुने पूल हे शेतकऱ्यांच्या रहदारी करण्याकरिता बांधले आहे.
मात्र RMC प्लांट च्या 40/50 टनाच्या अवजड वाहने रहदारी करत आहेत, सदर सर्वे नंबर 195 जागा ही कुलकायदा प्रकारची आहे, RMC प्लांट उभा करण्याअगोदर जागा NA केलीली नाही, सदर जागेवर साधारण 3000 ब्रास माती उत्तखंनंन झालेली आहे, महसूल खात्याने केवळ 563 ब्रास मातीचा पंचनामा केला आहे,
तक्रारदार राजू कुरशी हे तेथील स्थानिक शेतकरी, त्यांचे घर आणि त्यांची विहीर त्या RMC प्लांट च्या बाजूला आहे, RMC प्लांट मधून जे केमिकल निघेल ते राजू कुरेशी यांच्या विहिरीत जाऊन पाणी दूषित होऊन विषबाधा होण्याची दाट शक्यता आहे, RMC प्लांट च्या बाजूने आंबा काळवा गेलेला आहे त्या कळव्या मधून वाहणारा पाणी आंबा नदीमध्ये जातो,त्यामुळे RMC प्लांट चे केमिकल हे आंबा नदी मध्ये जाऊन संपूर्ण आंबा नदी केमिकल युक्त दूषित होईल, सदर आंबा नदीचे पाणी नागोठणे परिसर, पेण तालुका आणि अलिबाग येथे पाणी पिण्यासाठी सप्लाय होतो, केमिकल युक्त पाणी पिल्यामुळे भविष्यात मोठी मनुष्य हानी होऊ शकते.
सदर बेकायदेशीर कामाबाबात एप्रिल महिन्या पासून मी राजू कुरेशी संबंधित अधिकारी यांच्याकडे दाद मागत आहे मात्र भ्रष्टाचारा मध्ये बुडालेले कोलाड पाटबंधारे चे अधिकारी आणि महसूल चे अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही
सदर प्रकाराला कंटाळून मी राजू कुरेशी आज मंत्रालय मुंबई येथे आज आत्मदहन कारण्याचा प्रयत्न केला आहे.