प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे. : ( प्रतिनिधी ) :
पुणे : येथील सेवा आरोग्य फाऊंडेशन,सेवा भारती सातारा व श्री कोटेश्वर देव विश्वस्त मंडळ,गोवे यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील गोवे या गावामध्ये नुकतेच नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. गावातील २६२ घरांशी संपर्क करण्यात आला होता.त्यांची नेत्र तपासणी व विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.१९७ व्यक्तींमध्ये दृष्टी दोष आढळले.८५ जणांना माफक दरामध्ये चष्मे वाटप करण्यात आले.४७ जणांना मोतीबिंदू आढळल्याने त्यापैकी ४० व्यक्तींचे पुण्यातील संजीवनी रुग्णालयात माफक दरात ऑपरेशन करण्यात आले.
सेवा आरोग्य फाऊंडेशनचे स्वयंसेवक व कार्यकर्ते,सेवा भारती सातारा मंडळ,श्री कोटेश्वर देव विश्वस्त मंडळ,कोटेश्वर शिक्षण प्रसारक मंडळी,रेणुका नेत्रालयचे डॉक्टर्स,सेवक मंडळी,संजीवनी रुग्णालय व तेथील डॉक्टर्स,सेवक यांच्या पुढाकाराने हे नेत्र शिबिर यशस्वी झाले. हे नेत्रशिबिर यशस्वितेसाठी गोवे येथील श्री कोटेश्वर देवस्थान तर्फे आर्थिक मदतही देण्यात आली.
हे शिबिर यशस्वितेसाठी प्रदीप कुंटे, सुधीर जवळेकर,विष्णू आपटे यांनी पुढाकार घेतला.
अधिक माहितीसाठी
*विष्णू आपटे*
9822313796
कर्वेनगर पुणे
सोबत फोटो
फोटो ओळ
फोटो क्रमांक १
गोवे गावातील ग्रामस्थांसाठी आयोजित नेत्र तपासणी शिबिर क्षणचित्रे
फोटो ओळ
क्रमांक २
नेत्र तपासणी शिबिरार्थी