महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या वतीने माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा जाहीर निषेध, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : राजकारणातला अजातशत्रू माजी आमदार माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटातील ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची काल मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न एरणीवर आला आहे महाराष्ट्र गृह खात्याचा कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे,

 यांच्या हप्त्याच्या जाहीर निषेध महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या वतीने करण्यात येत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राजीनामा द्यावे आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांच्यावतीने करण्यात येत आहे

Post a Comment

Previous Post Next Post