हडपसर विधानसभेसाठी कॉंग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष हाजी उस्मान तांबोळी यांची पक्षाकडे उमेदवारी साठी मागणी

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : हडपसर विधानसभेसाठी कॉंग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष हाजी उस्मान तांबोळी  यांनी पक्षाकडे उमेदवारी साठी मागणी केली आहे.गेली चाळीस वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय राहुन पक्ष वाढीसाठी पक्षाचा विचार लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी तांबोळी यांनी योगदान दिले आहे.

 नऊ वर्षापासून काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या उस्मान तांबोळी यांचे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान आहे. महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन, वंचित घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम घेऊन त्यांना योग्य न्याय देण्याची भूमिका आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी, जेष्ठ नागरिकांनासाठी नेञ तपासणी व मोफत चष्मे वाटप, निराधार व अपंग गरजू महिलांना मदत व साहित्य वाटप असे सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात याची पोहच पावती म्हणून पक्षाचे विधानसभचे तिकीट द्यावे अशी भावना तांबोळी यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post