निवडणूक निरीक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षाला भेट दिली


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  जिल्हयातील विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षाला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला.

निवडणूक निरीक्षक मानवेश सिंह सिद्धू, ललीत कुमार, भीम सिंह, पीगे लिगू, अरुंधती सरकार, नाझीम झई खान, गार्गी जैन, एम गौतमी, संजीव कुमार, के हिमावती, ए वेंकादेश बाबू, उमेश कुमार, प्रेम प्रकाश मीना, सुमीत कुमार आणि अमीत कुमार या भेटीत सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्ष समन्वयक डॉ.रविंद्र ठाकूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे सहायक प्राध्यापक योगेश बोराटे,सहायक संचालक जयंत कर्पे यावेळी उपस्थित होते.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमावरील बातम्या, जाहिराती आणि पेड न्यूजबाबत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती निरीक्षकांनी घेतली. जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली.जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्ष समन्वय अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, सहायक संचालक जयंत कर्पे यांनी माध्यम कक्षातर्फे तयार करण्यात येणाऱ्या विविध अहवालांची माहिती दिली. प्रा.बोराटे यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती, पेड न्यूज व त्यावर केलेली कार्यवाही याबद्दलची  माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post