प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा पुणे शहर सरचिटणीस सलीम शेख यांनी पुणे विमानतळ ते सौदी अरेबिया (हज आणि उमराह) थेट विमानसेवा सुरू करण्याची विनंती भारताचे स्थानिक खासदार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना केली आहे पुण्याहून सौदी अरेबियाला थेट विमानसेवा सुरू झाल्यास त्याचा फायदा औरंगाबाद, सोलापूर, सांगली मिरज, बारामतीला होईल.व साताऱ्यातील सर्व मुस्लिम बांधवांना लाभ होईल. स्थानिक आमदार सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लवकरात लवकर तसे आश्वासन दिले
लवकरच आम्ही पुण्याहून सौदीला थेट विमानसेवा सुरू करणार असून मुस्लिम समाजाच्या हितासाठी सर्व योग्य निर्णय घेतले जातील. यावेळी सलीम शेख, अजीम गुडाकुवाला, मुनव्वर रामपुरी खान, अहमद शेख, आफ्रिदी शेख, इम्तियाज शेख, गौहर खान यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.