महाविकास आघाडीने केला मुस्लिमांच्या विश्वासघात

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : काही वेळापूर्वी शरद पवार गटाचे एकूण 44 लोकांची यादी जाहीर करण्यात आली एकूण त्या यादीमध्ये आष्टी मधून फक्त मेहबूब शेख एका मुस्लिमांना उमेदवारी दिली उर्वरित यादीमध्ये इतर मुस्लिमांचे नाव दिसून येत नाही. महाराष्ट्रात असलेल्या मुस्लिमांची लोकसंख्या नुसार वास्तविक पाहता त्यांना सत्तेत भागीदारी दिली पाहिजे ही भावना गेल्या लोकसभा निवडणुकीपासून सतत मुस्लिम समाज बांधव मांडत आलेला आहे. 

मुस्लिमांना सत्तेत भागीदारी द्यावी या करिता खुद्द पद्मविभूषण खासदार पवार साहेब यांची पुणे शहरातील नामवंत मुस्लिम धर्मगुरूंनी व सामाजिक संघटनांनी साधारण तीन वेळा बैठक घेतली त्या बैठकीत मुस्लिम बांधवांनी एकच आग्रा केला होता की पुणे शहरात असलेल्या 21 विधानसभा मतदारसंघांपैकी किमान एक तरी विधानसभा मतदारसंघातून मुस्लिमांना उमेदवारी द्यावी हडपसर विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाज बांधवांची लोकसंख्या चांगली असल्याने त्या ठिकाणी महाविकास आघाडीने जर उमेदवारी दिली तर नक्कीच मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकतो गेल्या 40 वर्षांपूर्वी सन 1980 ते 1985 पुण्यामधून फक्त एकच आमदार निवडून गेले होते त्यानंतर यंदा चांगली संधी असल्याने मुस्लिमांना उमेदवारी देऊन समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी याकरिता मुस्लिम समाजाची मागणी होती. ज्या समाजाने लोकसभा निवडणुकीत भरभरून मतदान दिला विधान परिषद चे जागा ही मुस्लिमांना दिले नाही तरीही मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा हडपसर विधानसभा एकमेव मतदारसंघ असा आहे ज्या ठिकाणी मुस्लिम लोकसंख्या जवळपास एक लाख 15 हजार पेक्षा जास्त असल्याने त्या ठिकाणी सहज मुस्लिम उमेदवार निवडून आला असता मात्र त्याही ठिकाणी माननीय शरदचंद्र पवार गटाचे प्रशांत जगताप यांचा नाव जाहीर केला आहे. मुस्लिमांचा हक्काचा असलेला मतदारसंघात समाजाला डावलून इतरांना तिकीट देणे म्हणजेच मुस्लिम समाजाचा विश्वासघात करणे आहे असा आरोप मुस्लिम राजकीय मंचाचे नेते अंजुम इनामदार यांनी व्यक्त केला. 

लवकरच याबाबत पुणे शहरातील सर्व पंथाचे मुस्लिम धर्मगुरू, सामाजिक संघटना, प्रतिष्ठित कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविले जाणार. यावेळी मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्व न देऊन समाजावर केलेल्या अन्याय यावेळी मुस्लिम समाज सहन करणार नाही असा इशारा मुस्लिम राजकीय मंचाचे वतीने देण्यात येत आहे.


आपला विश्वासू 

अंजुम इनामदार 

मुस्लिम राजकीय मंच 

9028402814

Post a Comment

Previous Post Next Post