पुण्यातील मंडई मेट्रो स्थानकाला लागलेली आग आटोक्यात

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : येथील मंडई मेट्रो स्टेशनच्या तळमजल्यावर फोम मटेरियलचा समावेश असल्याची घटना सोमवारी (21 ऑक्टोबर 2024) रात्री उशिरा घडली. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, प्राथमिक माहितीनुसार स्टेशनवर वेल्डिंगचे काम सुरू असताना आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मेट्रो स्टेशनचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

मंडई मेट्रो स्थानकाच्या तळमजल्यावर सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मेट्रो प्रवासी सेवा संपल्यानंतर वरील घटना घडली. मेट्रो स्टेशन परिसरात वेल्डिंगचे काम सुरू असताना ही घटना घडली. या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post