प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे (औंधरोड ).. कै. बाबुराव गेनबा शेवाळे या दवाखान्या मध्ये दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी आरोग्य अधिकारी पुणे मनपा यांना निवेदन देण्यात आले होते व रुग्ण हक्क आंदोलन पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संथापक अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर)यांच्या नेतृत्वखाली घेण्यात आले होते या आंदोलनाचे आयोजन पुणे शहर अध्यक्ष संदीपभाऊ शेंडगे यांनी केले होते.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे मॉडम यांनी निवेदनाची व आंदोलनाची दखल घेत शेवाळे दवाखान्यास समक्ष भेट देऊन तेथील डॉक्टर, सेविकांना सूचना दिल्या रक्तदाब तपासणी करणे, स्टेथोस्कोप वापरून तपासणे, थरमामीटर लावून तपासणे, कमीत कमी पाच दिवसांचे औषधे पुरेशा प्रमाणात रुग्णांना देणे व चांगल्या प्रतीची औषधे रुग्णांना देण्यात यावी असे सूचित करण्यात आले
सदर दवाखान्यामध्ये ईसीजी मशीन, ऐक्स -रे मशीन, सोनोग्राफी मशीन, डेंटल सुविधा, व फिजीओथेरीपी अशा दर्जेदार सुविधांची मागणी आंदोलनामध्ये करण्यात आली होती त्यांनी रीतसर प्रयत्न व प्रस्ताव मा. आयुक्त कार्यालयाकडे करण्यात येईल मान्यते नंतरच सदरील सेवा रुग्णांना देण्यात येतील असे परिपत्रक पुढील कार्यवाही करिता आयुक्त कार्यालयाकडे देण्यात आले