रुपाली चाकणकर यांच्या पुनर्नियुक्तीमुळे शहर राष्ट्रवादीत असंतोष , अजित पवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्याने शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असंतोष वाढला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांची राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्यात आली नाही. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या पुणे शहरातील 600 पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले. आज देखील हे राजीनामा सत्र सुरू असल्याचं चित्र आहे. 

 दिपक मानकर नाराज....

दिपक मानकर यांना विधान परिषदेवर संधी न दिल्याने अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत रोष व्यक्त केला होता. त्यानंतर दिपक मानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी मागील 40 वर्षांपासून राजकीय आणि समाजिक जीवनात कार्य करत आहे. या संपूर्ण कालावधीत राजकीय जीवनात अनेक पदं भूषवली आणि पदांना न्याय देण्याच काम केलं . गेल्या दीड वर्षापूर्वी माझ्यावर पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्या पदाला न्याय देऊन विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षासोबत जोडण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर लोकसभेवेळी देखील त्यांनी मोठी मेहनत केल्याचे सांगितले. तर रुपाली चाकणकर यांना पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षापदावर पुन्हा संधी देण्यात आली त्याबाबत देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

या प्रकरणावरून आता अजित पवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आज दीपक मानकर अजित पवारांना भेटण्यासाठी पोहोचले आहे. अजित पवार येण्याआधीच दीपक मानकर पक्ष कार्यालयात आले आहेत. त्यानंतर रुपाली ठोंबरे देखील आज पक्ष कार्यालयात अजित पवारांची भेट घेणार आहेत. मानकर यांच्या कार्यकर्त्यांनी मानकरांना विधान परिषद मिळाली नाही म्हणून राजीनामा सत्र सुरू केलं आहे. तर दुसरीकडे रुपाली चाकणकर यांना सातत्यानं पक्षात पद दिली जात आहेत म्हणून रूपाली ठोंबरे यांनी पक्षावरच टीकेची झोड उठवली आहे. याबाबत आज दोन्ही नेते अजित पवारांची पक्ष कार्यालयात भेट घेत आहेत.

ऐन विधासभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेली नाराजी आणि राजीनामा सत्र यामुळे पुन्हा एकदा पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अशातच रूपाली चाकणकर यांना दिली जाणारी पदे आणि जबाबदाऱ्या यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यांनी देखील यावेळी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post