गुंतवणूकदारांच्या पाठीशी उभे राहू : मुरलीधर मोहोळ
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : डी एस कुलकर्णी यांच्या कंपन्यात ठेवी बुडलेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या चैतन्य सेवाभावी संस्था (असोसिएशन ऑफ डीएसके फ्रॉड व्हिक्टिम्स) ने हिंदू महासंघाच्या पुढाकाराने डीएसके गुंतवणूकदारांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली.गुंतवणूकदारांचे निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी सरकार आणि पक्ष म्हणून देखील गुंतवणूकदारांच्या पाठीशी उभे राहू ,असे आश्वासन दिले. हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे यांच्या नेतृत्वाखाली ५०० गुंतवणूकदार उपस्थित होते.
रविवारी सकाळी 10.30 वाजता आर सी एम कॉलेज येथील जनता भेटी च्या कार्यक्रमात हिंदू महासंघ आणि ठेवीदार यांनी मोहोळ यांची भेट घेतली. ' आमचा विषय दिल्लीत मांडावा आणि केंद्रीय यंत्रणानी कशा पद्धतीने नियोजन पूर्वक आमचे पैसे बिल्डर च्या घशात घातले आहेत ते पाहून तोडगा काढावा',अशी मागणी केली.येणाऱ्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल यांची सुद्धा त्यांना कल्पना देण्यात आली. येणाऱ्या काळात आंदोलन तीव्र करत बिल्डर्स च्या घरात आंदोलने होणार आहे',असेही आंदोलकांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले,'गुंतवणूकदारांच्या भावना आम्ही समजू शकतो.या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे.गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळाले परत मिळाले पाहिजेत,हीच सर्वांची भावना आहे.सरकारी पातळीवर पावले उचलू.वरिष्ठ कायदेशीर तज्ज्ञांशी चर्चा करून करून पुढे जाऊ.गुंतवणूकदारांनी काळजी करू नये.त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन तोडग्यासाठी प्रयत्न केले जातील'.