शालेय जीवनापासून कर्करोगाची जनजागृती व्हावी - कर्करोग शल्यविशारद डॉ. अमृता बेके

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

गर्भाशय मुखाचा कर्करोग जागृतीसाठी दुचाकी रॅली पुणे : गोरान ग्रॉसस्कॉफ फॅमिली क्लीनिक, कोथरूड, पुणे मार्फत महिलांना होणार गर्भाशयमुखाचा कर्करोग' व एचपीव्ही 'लसीकरण'च्या  जनजागृतीकरिता रविवारी युवक व युवती सोबत मोटरसायकल व स्कूटर रॅली काढण्यात आली.

रॅलीचे उदघाटन नामवंत कर्करोग शल्यविशारद डॉ. अमृता बेके, संस्थेच्या अध्यक्षा फ्रेनी तारापोर आणि उपाध्यक्षा गीतांजली देशपांडे यांच्या हस्ते कोथरूड येथील चांदणी चौकातील गोरान ग्रॉसकोफ फॅमिली क्लिनिक येथे झेंडा दाखवून झाले. जगभरात कर्करोगाच्या रुग्णांची संख्येत वाढ होत आहे. योग्य वेळी काळजी व तपासणी न केल्यामुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. वेळीच तपासणी व निदान केल्यास आपला जीव वाचू शकतो. त्यासाठी शालेय शिक्षणापासून कर्करोगाविषयी माहिती दिली पाहिजे. कर्करोगात विविध प्रकार असून याबाबत मोकळ्यापणाने बोलले गेले पाहिजे. कर्करोग मुक्त होण्यासाठी आपण सर्वांनी एक मोठी चळवळ राबवावी, असे आवाहन कर्करोग शल्यविशारद डॉ. अमृता बेके यांनी केले. कर्करोग  पहिल्या टप्प्यातच निदान झाल्यास पूर्णत: बरा होतो.  महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोगया विषयी माहिती व्हावी, लक्षणे व उपचाराची माहिती व्हावी, यासाठी गोरान ग्रॉसकोफ फॅमिली क्लिनिकतर्फे जनजागृतीचा उपक्रम स्तुत्य आहे. प्रत्येक महिलेने एचपीव्ही लस घ्यावी असे ही यावेळी त्यांनी नमूद केले.               याप्रसंगी क्लिनिक समोर  कर्करोगा विषयी जनजागृती करणारी भव्य रांगोळी साकारण्यात आली होती. मुलींनी छत्री नृत्याद्वारे विविध संदेश देऊन कर्करोगा विषयी जनजागृती केली. या सर्व मुलींचा सत्कार डॉ अमृता बेके यांनी केला आणि  काही मुलींच्या एच. पी. व्ही. लसीकरणासाठी मदत जाहीर केली.  नियमित तपासणी करा. गर्भाशय मुखाचा कर्करोग दूर ठेवा, एच पी व्ही लस घेऊया, गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळूया, करूया गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची जागरूकता घरोघरी : आपल्या सर्वांची ही जबाबदारी,  एचपी व्ही लस घ्या, सावध बना,सुरक्षित रहा ही जनजागृती करणारी फलके हाती घेऊन तरुणाई दुचाकी रॅलीत सहभागी झाली होते. 

    संस्थेच्या चांदणी चौकातील कार्यालयापासून  रॅलीला प्रारंभ झाला. तेथून कर्वे रोड, कर्वे पुतळा, भुसारी कॉलनी आणि पुन्हा गोरान ग्रॉसकोफ फॅमिली क्लिनिक येथे रॅलीचा समारोप झाला.

       २०२४ ते २०२५  हे वर्ष फॅमिली प्लॅनिंग  असोसिएशन ऑफ इंडियाचे ७५वे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. या वर्षामध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि त्यावरील एचपीव्ही लसीकरण याबद्दलचे मार्गदर्शन आणि जाणीव जागृतीवर भर दिला जात आहे. गोरान ग्रॉसकोफ फॅमिली क्लिनिक कोथरूड, फॅमिली प्लँनिंग  असोसिएशन ऑफ इंडिया अंतर्गत लैंगिक आणि प्रजनन आरोग्य व अधिकार या विषयावर १३ वर्षांपासून पुण्यातील काही भाग आणि मावळ व मुळशी येथील काही गावांमध्ये कार्यरत आहे.

 भारतामध्ये  गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे दर सात मिनिटाला एका महिलेचा मृत्यू होत आहे आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ३० वयानंतर महिलांच्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी केलेल्या तपासण्या आणि  ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी लसीकरण या माध्यमातून गर्भाशय मुखाच्या  कर्करोगापासून प्रतिबंध होऊ शकतो. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या कोथरूड येथील क्लिनिकमध्ये चालू वर्षांमधे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी मोफत स्वरूपात उपलब्ध करण्यात  आली आहे,अशी माहिती संस्थेच्या प्रकल्प अधिकारी अर्चना ससाणे यांनी दिली.


अर्चना ससाणे, प्रकल्प अधिकारी – 7745899022



Post a Comment

Previous Post Next Post