प्रेस मीडिया लाईव्ह :
कोथरूड सह पुण्यातील सर्वच रहदारीच्या भागांमध्ये दिवसाढवळ्या बेकायदेशीर जड वाहतूक (डम्पर, ट्रक, मिक्सर) चालू आहे. कोथरूडमध्ये अनेक सर्वसामान्य लोकांचा जीव जात असून सुद्धा इथले लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलीस कोणती कारवाई करत नाही. या विरोधामध्ये आज कर्वे पुतळा परिसरामध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. अनेक जड वाहतूक करणाऱ्या डंपर, मिक्सर अडवून त्यांची वाहतूक यंत्रणेमार्फत तपासणी करायला पोलिसांना भाग पाडले.
कोथरूड मधील चंद्रकांत दादा पाटील, मुरलीधर अण्णा मोहोळ,यांच्या कार्यालयासमोर ही स्थिति आहे. ट्रिपल इंजिन सरकार काय करत आहे? पुणेकरांचा जीव स्वस्त झाला आहे का?