विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीवर सामाजिक कार्यकर्ता अनवर शेख यांनी आक्षेप नोंदवला

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेस मधील गटबाजी उफाळून आली असून जेष्ठ आणि निष्ठावान नेत्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ता अनवर शेख यांनी आक्षेप नोंदवला असून, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) यांना ईमेल व पत्राद्वारे उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे.

अनवर शेख यांनी काँग्रेस नेतृत्वाला आवाहन केले आहे की, त्यांनी जनतेच्या आवाजाला प्राधान्य देत योग्य व पारदर्शक उमेदवार निवडीची प्रक्रिया स्वीकारावी. त्यांना विश्वास आहे की योग्य उमेदवार निवडल्यास कासबा मतदारसंघाच्या प्रगतीसाठी काँग्रेसची बांधिलकी सिद्ध होईल.

या बाबत अनवर शेख म्हणतात, कसबा विधानसभा क्षेत्राला असा प्रतिनिधी हवा आहे जो फक्त समस्या समजून घेणार नाही, तर तत्परतेने त्या समस्यांचे निराकरण करेल. आम्ही काँग्रेस नेतृत्वाला आवाहन करतो की त्यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा आणि जनतेच्या हितासाठी

Post a Comment

Previous Post Next Post