क्रीडा वृत्त: आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच दीप्ती शिदोरे हिची राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून निवड


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे - येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच दीप्ती शिदोरे हिची राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेसाठी प्रमुख पंच (chief arbiter ) म्हणून अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेने (AICF) नियुक्ती केली आहे. सदर स्पर्धा ३ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीमध्ये तामिळनाडू मधील करायीकुडी येथे होत आहे.त्याचप्रमाणे दीप्ती शिदोरे* हिने स्लोव्हनिया ( युरोप ) येथे फेअर प्ले सेमिनार देखील पूर्ण केला आहे.

नुकत्याच हुंगेरी बुडापेस्ट येथे देखील फेअर प्ले कोर्स त्याचप्रमाणे जागतिक दर्जाची महिला बुद्धिबळ खेळाडू ग्रँडमास्टर ज्यूडीत पोलगर हिच्या ग्लोबल फेस्टिवल मधे देखील केले आहे.यापूर्वी दीप्ती हिने जागतिक ऑलिम्पियाड, आशियाई,जागतिक जुनिअर, तसेच राष्ट्रीय व स्थानिक बुद्धिबळ अनेक स्पर्धामध्ये पंच (chief arbiter) म्हणून काम केले असून सध्या भारतामधील सर्वात तरुण महिला पंचांमध्ये दीप्ती शिदोरे हिचा समावेश आहे.


अधिक माहितीसाठी

संपर्क क्रमांक

राजेंद्र शिदोरे

9890485666

Post a Comment

Previous Post Next Post