प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : हडपसर मध्ये जागावाटप आणि उमेदवारीवरून गुढ कायम होता. मात्र हडपसर मधून चेतन तुपे यांना उमेदवारी देऊन जागावाटप आणि उमेदवारीच्या चर्चेला अजित पवार गटाकडून पूर्णविराम देण्यात आला आहे. हडपसर विधानसभा मतदार संघातून महायुतीतून अजित पवार गटाला उमेदवारी मिळणार असल्याचे सूत्रांकडून कळले होते. अशातच एकनाथ शिंदे गटाचे प्रमोद नाना भानगिरे यांनीसुद्धा हडपसर मधून उमेदवारी मागितली होती. आता महायुतीकडून तुपेंना उमेदवारी देऊन भानगिरेंचा पत्ता कट केला आहे.
हडपसरमधून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करत प्रमोद नाना भानगिरे यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती. त्यांनी मुखमंत्र्यांना भेटण्यासाठी पुणे ते मुंबई पायी वारीही केली होती. पुण्यातील हडपसर विधानसभेत शिवसेनेसाठी अनुकूल वातावरण आहे. नाना याठिकाणी नक्की निवडून येतील. ते हडपसरचा विकासही करतील असंही ते म्हणाले होते. अखेर तुपे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.