आमदार रवींद्र धंगेकर यांची टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  :  येथील विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. कसबा पेठ विधानसभा मतदार संघातून एक महिला कॉंग्रेसच्या नेत्याने विधानसभा निवडणूक लढविण्याचा इशारा दिला आहे.कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या उमेदवारीला याआधी देखील स्थानिक नेत्यांकडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे कसब्यातील महाविकास आघाडीत उमेदवारीचा पेच अजूनही कायम आहे. अशातच कॉंग्रेसच्या महिला नेत्या कमल व्यवहारे यांनी अलिकडेच संभाजीराजे भोसले यांची भेट घेतली आहे. त्यांनी याआधी विधानसभा निवडणूक लढविण्याची देखील इच्छा बोलून दाखवली आहे. तसेच त्या कसबा पेठ विधानसभा मतदार संघातून इच्छूक आहेत.

कमल व्यवहारे यांचं कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात चांगलं संघटन राहिले आहे. त्या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून पुण्याच्या पहिला महिला महापौर होण्याचा मान देखील त्यांच्याच नावावर आहे. यातच ४० वर्षांपासून मी कॉंग्रेसची सदस्य राहिलेली आहे. यंदा परिवर्तन करणार आणि निवडणूक लढवणारच, असा निर्धार करत त्यांनी विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर यांचं टेन्शन वाढवलं आहे. तसेच मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. परंतु कोणत्या पक्षात जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post