कोथरुड : बालवडकरांनी बंडखोरी केली तर कोथरुडकर कोणाला साथ देणार

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : चंद्रकांत पाटील हे मुळचे कोल्हापुरचे असल्यामुळे कोथरुडकरांवर बाहेरील उमेदवार लादला जात असल्याने स्थानिक नेत्यांना संधी मिळत नसल्याची  नाराजी भाजपात आहे. दोन्ही वेळच्या उमेदवारीवेळी हा वाद उफाळून आला होता. यंदा बालवडकर यांनी उमेदवारी आपल्याला मिळावी म्हणून जोरदार  मागणी केली होती. पण स्थानिक असलेल्या बालवडकर यांना भाजपाने डावलून पुन्हा चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली आहे. कोथरुड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. बालवडकर हे तळागाळातून वर आलेले कार्यकर्ते आहेत. त्यांची पत्नी पुणे महापालिकेची नगरसेविका आहे. यामुळे जर बालवडकरांनी बंडखोरी केली तर कोथरुडकर कोणाला साथ देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 कोथरूड विधानसभा मतदार संघ आणि पर्वती विधानसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवारीवरून वाद निर्माण झाले होते. या वादात भाजपने अगोदरच्या आमदारांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरण्याची संधी दिली आहे. भाजपची पहिली यादी जाहीर झाली. त्यामध्ये पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील, पर्वती विधानसभेतून माधुरी मिसाळ आणि शिवाजीनगर विधानसभेतून सिद्धार्थ शिरोळे यांना लढण्याची संधी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post