पुणे जिल्ह्यातील काँग्रेस इच्छुकांनी मुलाखतीच्या वेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले


.त्यानंतर पुणे जिल्ह्यातील आणि दुपारीनंतर पुणे शहरातील विधासभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. 

काँग्रेस भवन येथे इच्छुकांचे वाजत गाजत आणि समर्थक जोरदार घोषणा देत होते. काँग्रेस भवनाच्या पहिल्या मजल्यावर मुलाखती घेण्यात आल्या. तेथे केवळ इच्छुकाला सोडण्यात येत होते. त्यामुळे समर्थक काँग्रेस भवना बाहेर होते. त्यामुळे कॉग्रेस भवनचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. या मुलाखतींच्या आधारे राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि केंद्रातील नेते उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांमधील तब्बल 10 विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. यात पुणे शहरातील शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा आणि हडपसर या पाच विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. काँग्रेसने जिल्ह्यातील पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघाबरोबरच खेड, शिरूर आणि दौंड या मतदारसंघांवरही दावा केला आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक

पुणे शहारात काँग्रेसकडे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १२ इच्छुक आहेत. कोथरूडमध्ये १, वडगावशेरी ५, कसबा ६, पुणे कॅण्टोन्मेंट ११, पर्वती ३, हडपसर ३, खडकवासला विधानसभा मतदारसंघात कॉग्रेसकडुन ३ जण इच्छुक आहेत. पिपंरी विधानसभा मतदारसंघात १०, चिचंवड मध्ये ९, भोसरीमध्ये ३ जण इच्छुक आहेत. पुणे जिल्ह्यात मावळमध्ये सर्वाधिक म्हणजे १० जण इच्छुक आहेत. जुन्नर मध्ये २, आंबेगावमध्ये २, खेड आळंदीमध्ये ३, शिरूरमध्ये ३ , दौंड १, इंदापुर १, बारामती १, भोर १, पुरंदरविधानसभा मतदारसंघामध्ये १ जण इच्छुक आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post