भाजपच्या नेतृत्वाकडून पुढील 48 तासात पहिली उमेदवारी यादी जाहीर करणार असल्याचे संकेत

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला येतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या मतदारसंघांमध्ये शिवाजीनगर, खडकवासला, पर्वती, कोथरूड, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे विध्यमान आमदार आहेत तर कसबा पोटनिवडणुकी मध्ये भाजपला हा मतदारसंघ गमवावा लागला होत. एखाद दुसरा सोडला तर सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांना पक्षांतर्गत विरोध असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वाधिक विरोध हा खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये असल्याचा पाहायला मिळत आहे. मागील विधानसभा निवडणुकी मध्ये अवघ्या काही हजार मतांनी हा मतदारसंघ भाजपने राखला होता. त्यामुळे यंदा भाजप नेतृत्व या ठिकाणी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे कॅन्टोन्मेंट म्हणजे विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर तिथे देखील मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला निसटता विजय मिळाला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाराची पिछेहाट झाल्याची देखील पाहायला मिळालं. त्यामुळे इथे देखील भाजप विविध पर्यायांवर विचार करत असल्याचं बोललं जात आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघ हा अनेक वर्षे भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. असं असताना देखील मागील पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव भाजप नेतृत्वाच्या चांगली जिव्हारी लागला होतं. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघाबाबत भाजपकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. या ठिकाणी असलेल्या उपलब्ध पर्यायांचा आणि जातीय समीकरणांचा विचार करून भाजपकडून चेहरा निवडण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post