शरद पवार यांच्या खेळीमुळे अजित पवार टेन्शन मध्ये

हडपसर,वडगाव शेरी या दाेन मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहण्यास मिळू शकते.

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघा पैकी दाेन ठिकाणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला ८ पैकी ४ जागा मिळण्याची दाट शक्यता आहे.शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण असणार? याबाबत तर्क लावले जात आहेत.

हडपसरमधून  प्रशांत जगताप  यांचे तर वडगाव शेरीमधून  माजी आमदार बापू पठारे  किंवा त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांची नावे आघाडीवर आहेत. तर पर्वतीमधून अश्विनी कदम  सचिन तावरे खडकवासल्यातून सचिन दाेडके हे जाेरदार प्रयत्न करीत आहेत.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने दाेन जागा जिंकल्या हाेत्या. तर खडकवासला आणि पर्वती या दाेन विधानसभा मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला हाेता. खडकवासला मतदारसंघात केवळ अडीच हजार मतांच्या फरकाने सचिन दाेडके यांना पराभवाला सामाेरे जावे लागले हाेते. तर पर्वतीमध्ये अश्विनी कदम यांनी आमदार माधुरी मिसाळ यांना कडवी झुंज दिली हाेती. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. हडपसर,वडगाव शेरी या दाेन मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहण्यास मिळू शकते. हे दाेन मतदारसंघ काेण राखणार याबाबत राजकीय वर्तुळात आतापासूनच  चवीने व जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post