हडपसर मध्ये पाच माजी नगरसेवक अजित पवार यांची साथ सोडणार

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का बसला आहे. हडपसर मध्ये पाच माजी नगरसेवक अजित पवार यांची साथ सोडणार आहेत. अजित पवार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे साथ सोडणार आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे समजतेय.विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. आनंद अलकुंटे माजी नगरसेवक आहेत.सलग तीन वेळा पुणे महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

 पीएमपीएल चे माजी संचालक म्हणून ही काम केलं आहे. हडपसर मधून अजित पवार समर्थक माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, माजी नगरसेविका रुक्साना इनामदार यांचे पती शमशुद्दीन इनामदार यांच्यासह अजून दोन नगरसेवक दादाची साथ सोडणार आहेत. मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत आनंद अलकुंटे हडपसर मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post