प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे आठही विधानसभा मतदारसंघात बंडखोरी जोमात .त्यात कसबा मतदारसंघात काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे यांनी अर्ज दाखल केला आहे. शिवाजीनगरमधून काँग्रेसचे मनीष आनंद बंडखोरी करत मैदानात उतरले आहेत . पर्वती विधानसभेत काँग्रेसचे माजी महापौर आबा बागूल,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन तावरे,काँग्रेस व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष भरत सुराणा यांनी सुद्धा बंडखोरी केली आहे.
कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे,खडकवासला मतदारसंघात भाजपचे माजी आमदार शरद ढमाले, तर महाविकास आघाडीत शिवसेना उबाठाचे हरिश्चंद्र दांगट यांच्या पत्नी अनिता दांगट, नागेश शिंदे यांनी तर काँग्रेसचे मिलिंद पोकळे,राहुल मते यांनी अपक्ष अर्ज भरला आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून भाजपचे भरत वैरागे यांनी बंडखोरी केली आहे. हडपसरमधून शिवसेना उबाठाचे समीर तुपे महाविकासआघाडीतून बंडखोरी केली आहे.स्थानिक राजकीय कुरघोड्यांमुळे बारामती, वडगाव शेरी मतदारसंघ सोडता उर्वरित सर्व मतदारसंघात बंडखोरी सुसाट सुटली आहे.