प्रेस मीडिया लाईव्ह ,:
पुणे : कोथरूडकरांचा सर्वसामान्य जनतेचा सहज उपलब्ध असणारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी आज महाविकास आघाडीतील सर्व नेते पदाधिकारी व कोथरूडकरांच्या समवेत पायी चालत जाऊन अर्ज दाखल केला. छत्रपती श्री शिवाजी महाराज तसेच महर्षी केशव धोंडीबा कर्वे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेस सुरवात करण्यात आली. ठिकठिकाणी या पदयात्रेचे नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. तत्पूर्वी छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक चौक येथे महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांच्या नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत महाविकास आघाडीचे उमेदवार चंदकांत मोकाटेना बहुमताने निवडुन आणण्याचा संकल्प केला.
यावेळी बोलताना चंद्रकांत मोकाटे यांनी सर्व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार मानत त्यांच्यावर महाविकास आघाडीने टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी कटीबध्द राहील असे आश्वासन सर्वांना दिले.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर, खा. वंदनाताई चव्हाण, शहराध्यक्ष अंकुश काकडे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, अभय छाजेड, विकासअण्णा पासलकर, लक्ष्मीवाहिनी दुधाणे, स्वातीताई पोकळे, चंदूशेठ कदम, प्रशांत बधे, दामोदर कुंबरे, शिवा मंत्री, योगेश मोकाटे, तानाजी निम्हण, डॉ.अभिजित मोरे, गोपाळ तिवारी, राजेश पळसकर, विजय खळदकर, स्वप्निल दुधाणे, किशोर कांबळे यांच्या समवेत मोठ्या संख्येने महिला व ज्येष्ठ नागरिक, कोथरूडकर तसेच सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.