प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ' मंथन' या बहुभाषिक ग्राहक समुपदेशन स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.प्राचार्या व अधिष्ठाता डॉ. उज्वला बेडाळे, उपप्राचार्या डॉ. ज्योती धर्म, समन्वयक डॉ.विद्या ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन स्त्री-रोगतज्ञ डॉ. सागर पाठक यांच्या उपस्थितीत झाले. समारोप सत्राला आर्मी लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. शशीकांत हजारे, लेक्स क्रेडेन्सचे संस्थापक अॅड.एस.व्ही.अभंग,न्यू लॉ कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक अॅड. हर्षद पुजारी आदी उपस्थित होते.
दीक्षा धुमाळने प्रथम क्रमांक मिळवित 'अमृत 'चषक पटकावला, तर ऋचा ढमढेरे हिने द्वितीय क्रमांक मिळवत 'कल्पवृक्ष 'चषक पटकावला. समृद्धी शहा,प्रतिभा घोरपडे,नियती,समर्थ हुंडेकर यांना विविध पारितोषिके मिळाली.स्पर्धेत पत्रास विद्याथ्यांनी सहभाग नोंदविला.या स्पर्धेत कौटुंबिक विवाद,ग्राहक विवाद,आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अशा विषयांचा समावेश होता.
विषयतज्ञ आणि वकिली करणान्या वकिलांनी ग्राहकांची भूमिका बजावली, तसेच सहभागी विद्याथ्यांनी वकिलांची भूमिका बजावली. समुपदेशनाची भाषा मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधून निवडायची होती. न्यु लॉ कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रोहित सुरवसे, मयुरा पवार आणि आकांक्षा घाटोळ यांनी स्पपेंचे समन्वयक म्हणून काम पाहिले.डॉ. जयश्री खंदारे,शुभम त्रिपाठी ,स्वप्नील दाभोळकर,विद्यार्थी स्वयंसेवक अंश, धवल, उज्ज्वल, देवांश, अंकित, देवेश, निनाद, प्रज्ञा, रिद्धिमा, सिध्दी आणि इतरांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.न्यू लॉ कॉलेजच्या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.ही स्पर्धा नुकतीच भारती विद्यापीठ एरंडवणे कॅम्पसमध्ये दि.४ आणि ५ ऑक्टोबरला पार पडली.