सुनील टिंगरे यांची उमेदवारी निश्चित होणार का ? त्यांचा पत्ता कट होणार ?



प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे :  वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी कल्याणीनगर अपघात प्रकरणांमध्ये अल्पवयीन आरोपीला मदत केल्याचं आरोप त्यांच्यावर झाले होते. नुकताच शरद पवारांनी वडगाव शेरी मध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत सुनील टिंगरे यांच्यावर अपघात प्रकरणावरून निशाणा साधला होता. त्यामुळे सुनील टिंगरे  अडचणीत आले असून भाजपकडून सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यास विरोध होत असल्याचं बोलले जात आहे.

सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिल्यास पोर्षे अपघात प्रकरणाचं भांडवल विरोधी पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात करेल अशी काहीशी शक्यता भाजपच्या नेत्यांकडून वर्तवण्यात येत आहे.वडगाव शेरीची जागा भाजपाला सोडावी, असा प्रस्ताव भाजपाकडून अजित पवारांकडे देण्यात आल्याच्या चर्चा देखील गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्या पार्श्वभूमी वर आमदार सुनील टिंगरे यांनी अजित पवारांची तातडीने भेट घेतली आहे.

आपल्याला पुन्हा संधी मिळावी यासाठी ते दादांच्या भेटीला गेले असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आज किंवा उद्या येणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या यादीमध्ये सुनील टिंगरे यांची उमेदवारी निश्चित होणार का ?त्यांचा पत्ता कट होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post