प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : नव्याने बांधलेल्या इमारतींना इलेक्ट्रिक डीपी बसवण्यासाठी आणि वीजपुरवठा सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. मागणी केलेल्या लाचेच्या रकमेपैकी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.भाऊसाहेब मच्छिंद्र सावंत (वय ५१) असे आरोपी कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे.
याप्रकरणी एका विद्युत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली होती. आरोपी महावितरणच्या बंड गार्डन विभागात कर्मचारी आहे.एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा शासनमान्य विद्युत कंत्राटदार आहे. त्याच्या ओळखीचे काही बांधकाम व्यावसायिक आहेत. या बिल्डरांनी पाच इमारती बांधल्या आहेत. तक्रारदाराने या 5 नवीन इमारतींसाठी इलेक्ट्रिक डीपी बसवणे आणि वीज सुरू करण्याचे काम हाती घेतले होते. त्यासाठी त्यांनी ५ फाईल्स तयार करून आरोपी भाऊसाहेब सावंत यांच्याकडे मंजुरीसाठी दिल्या होत्या.
तक्रारदाराने दाखल केलेल्या 5 फाईल्स प्रलंबित होत्या. त्यावर कारवाई करण्यासाठी आणि मांजरी परिसरातील नवीन इमारतींसाठी उभारलेल्या डीपीवरील वीज भारनियमन मंजूर करण्यासाठी सावंत यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली. त्यामुळे या प्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली