प्रेस मीडिया लाईव्ह
वर्ष 2018 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेवानिवृत्त शिक्षकेत्तर- कर्मचारी डॉ. तुषार निकाळजे यांनी तत्कालीन प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांना विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजाचे संगणकीकरण व आय.एस.ओ. प्रमाणी करण करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता. त्यामध्ये डॉ. निकाळजे यांनी प्रशासकीय कामकाजात जलदता आणण्यासाठी डिजिटलायझेशन, ई- गव्हर्नन्स, पेपरलेस वर्क या संकल्पनांचा उल्लेख केला होता. ही प्रणाली वापरल्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, महाविद्यालयीन व विद्यापीठ कर्मचारी - अधिकारी यांच्या कामकाजात जलदता निर्माण होईल, या संदर्भात उल्लेख केला होता. डॉ. निकाळजे यांचा सदर प्रस्ताव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तत्कालीन प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी मा. व्यवस्थापन परिषदेकडे सादर केला. सदर प्रस्ताव मा. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला होता व त्याची नोंद घेण्यास सांगितले.
नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये विद्यापीठातील सर्व विभागांच्या आवक-जावक नोंदवह्या व कार्यालयीन टिप्पण्या, पत्रव्यवहार संगणकाद्वारे (ऑनलाइन पद्धतीने) सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी कोविड 19 कालावधीमध्ये वर्ष 2020 - 21 च्या घेतल्या गेलेल्या ऑनलाईन परीक्षांच्या वेळी डॉ. तुषार निकाळजे यांनी सांगितलेल्या "विंडो क्वेरी सिस्टीमचा" वापर करून विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयांच्या तक्रारींचे व अडचणींचे निवारण करण्यात आले होते.