स्वतःचे नाव व स्वाक्षरीचा वापर तोरा मिळवण्यासाठी टाळावा...

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

डॉ. तुषार निकाळजे

नुकतेच एका विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने सध्या कार्यरत असलेले व सेवानिवृत्त झालेले  प्राध्यापक , विभागप्रमुख, शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयीन ओळखपत्र देण्याचे परिपत्रक  काढले आहे. विद्यापीठ कायद्यानुसार कुलसचिव पदाची नियुक्ती पाच वर्षाकरिता असते. विद्यापीठांचे कुलगुरू कुलसचिवांची नियुक्ती करतात. परंतु पाच वर्षांनी कुलसचिव पद रिक्त झाल्यानंतर पुढील कालावधीकरीता कायमस्वरूपी कुलसचिव नेमण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक तसेच कायदेशीर बाबींचा अवलंब करीत असताना साधारणतः किमान आठ महिने व जास्तीत जास्त दीड वर्ष कालावधी लागतो. सध्या राज्यांच्या निवडणुका होणार असल्याने याबाबत आचारसंहितेची मर्यादा आली आहे . या दरम्यान प्रभारी कुलसचिव यांची नेमणूक केली जाते. दर पाच वर्षांनी विद्यापीठाचे प्राध्यापक, विभागप्रमुख, शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी यांना ओळखपत्र दिले जाते. त्यावर कुलसचिवांची स्वाक्षरी व नाव असते. प्रभारी कुलसचिवांचे स्वाक्षरीचे असलेले ओळखपत्र दिल्यानंतर काही महिन्यांनी कायमस्वरूपी पाच वर्षांच्या मुदतीचे पूर्ण वेळ कुलसचिवांची नेमणूक झाल्यास पुन्हा हे नवीन कुलसचिव स्वतःच्या स्वाक्षरीचे व नाव  असलेले नवीन ओळखपत्र विद्यापीठाचे प्राध्यापक, विभागप्रमुख, शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी यांना तयार करून देतील.  सदर खर्च विद्यापीठ फंड किंवा शासन, यूजीसी यांनी दिलेल्या निधी मधून केला जातो. दर पाच वर्षांमध्ये हा ओळखपत्रांचा खर्च दुप्पट करावा लागतो. परंतु त्या ऐवजी फक्त एकदाच पाच वर्षाच्या कायमस्वरूपी पूर्णवेळ अधिकाऱ्याकडून हे ओळखपत्र तयार केल्यास खर्च वाचू शकेल. या खर्चातील एक भाग गरजू विद्यार्थ्यांकरिता वापरता येणे शक्य आहे. प्रभारी पद फक्त ६ ते ८ महिने असते.

Post a Comment

Previous Post Next Post