श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट (तुळशीबाग)ने केला १८० निराधार बालकांचा पाहुणचार , दिवाळीच्या नव्या कपड्यांची भेट

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : दिवाळीचा मुहूर्त साधून श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट (तुळशीबाग) ने नागरी वस्तीतील १८० निराधार बालकांचा अल्पोपहार देऊन दिवाळी पाहुणचार केला आणि नवीन कपडे भेट दिले.हेमंत रासने,आशिष शहा,ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल दहिभाते हे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते.श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट (तुळशीबाग) चे अध्यक्ष सागर सुनिल दहीभाते यांनी स्वागत केले.बुधवार,दि.३०ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अगत्य हॉटेल (तुळशीबाग) येथे हा कार्यक्रम झाला.या उपक्रमाचे हे आठवे वर्ष होते.अरविंद तांदळे,सिद्धार्थ सातपुते,गजानन शालगर,नरेश तडका,रुपेश व्हावळ,प्रताप बिराजदार आणी तुळशीबाग परिवारातील सदस्य उपस्थित होते.सोमनाथ भोसले यांनी सूत्रसंचालन केले.

माणुसकीची दिवाळी सर्वत्र जावो !:हेमंत रासने 

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना हेमंत रासने म्हणाले,'श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट,(तुळशीबाग) हे समाजकार्यात अग्रेसर असलेले मंडळ आहे.यांच्या वतीने सलग ८ व्या वर्षीही १८० निराधार लहान मुलांसोबत माणुसकीची दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली.त्यातून प्रेम-आपुलकी-जीव लावल्यावर समाजात अतूट विश्वास निर्माण होतो.हाच विश्वास समाजात एक धैर्य-शक्ती-धाडस निर्माण करतो.आपली येणारी पिढी देशाची अमुल्य संपत्ती आहे.आपले सण, परंपरा जपताना समाजातला शेवटचा कोणताही घटक वंचित राहता कामा नये अशी काळजी जी मनं घेतात,त्यांच्याच हातुन राष्ट्राची उदंड सेवा एका समर्पित भावनेने घडते.'

'माणूस म्हणुन जगताना वेगवेगळ्या वाटांवर समोर आलेल्या पीडितांना सोबत घेऊन पुढे जात राहणं हाच आपला मुळ धर्म, मुळ कर्तव्य आहे.तुळशीबाग परिवारातील सदस्यांनी माणुसकीचा धर्म पुढे नेताना आपल्या घासातील एक घास उपेक्षीतांना देतांना एक समजूतदारपणाची भुमिका  सर्व सहकारी घेतात,याचा  विलक्षण आनंद आहे असेच काम श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट वतीने होत राहो',अशा शुभेच्छा  आशिष शहा,ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल दहिभाते यांनी दिल्या.

  



Post a Comment

Previous Post Next Post