प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : बोपदेव घाट येथे मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर तिघा आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता.गेल्या ९ दिवसांपासून हे आरोपी पुणे पोलिसांना गुंगारा देत होते. आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी जंग जंग पछाडले. तरी सुद्धा आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर ७०० सीसीटीव्ही, ४०० सराईत गुन्हेगारांची झडती घेऊन एआयच्या माध्यमातून अखेर पुणे पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला.या आरोपीला पुणे पोलिसांच्या पथकाने गुरुवारी वारजे माळवाडी परिसरातून अटक केली आहे. एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दोघे फरार आहे. या आरोपीने गुन्हा कबूल केला असून सर्व आरोपी राज्यभाहेरील असून रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पुण्यात बोपदेव घाटात रात्री आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणीवर आणि तिच्या मित्रावर हल्ला करण्यात आला होता. त्यांना शस्त्राचा आणि लाकडी दांडक्यांचा धाक दाखवत त्यांच्याजवळ असेलल्या वस्तू घेऊन तरूणाला झाडाला बांधून ठेवण्यात आले होते. तर यानंतर तिघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. यानंतर हे आरोपी फरार झाले होते. ९ दिवसांनपासून पोलिस आरोपींच्या मागावर होते. तब्बल ६० पथक व गुन्हे शाखेचे कर्मचारी या आरोपींचा मग काढत होते. अखेर शुक्रवारी पुणे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आरोपींनी मुलीवर बलात्कार केल्यावर पोलीसांना सापडू नये यासाठी विविध क्लूप्त्या वापरल्याचं तपासात पुढं आलं आहे.
पुणे पोलिसांनी या प्रकरणी तब्बल ६० पथकांची स्थापना केली होती. पीडित मुलगी आणि तरुणाने दिलेल्या वर्णनानुसार आरोपीचे रेखाचित्र काढून तपास सुरू करण्यात आला. मात्र, घाटात सीसीटीव्ही आणि मोबाइल रेज नसल्याने आरोपीचा शोध घेण्यास अडचणी येत होत्या. यामुळे पोलिसानी नागपूर येथील एआय सिंबा द्वारे चोरट्यांचा शोध घेतला. सीसीटीव्ही आणि रेखचित्रामुळे गुन्हेगारांची ओळख पटली आणि पोलिसांचा तपास सोपा झाला. या आरोपींवर या पूर्वी देखील गुन्हे असल्याने त्यांचा शोध घेणे सोपे झाले आणि खबऱ्यांमार्फत मिलेलेल्या माहितीनुसार पुण्यातील वारजे भागातून एका आरोपीला अटक करण्यात आली. सध्या फरार आरोपींचा देखील शोध घेतला जात आहे.