विधानसभा निवडणुकीत धायरीतील रखडलेल्या डीपी रस्त्याचा प्रश्न गाजणार

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे:  दिड लाखावर मतदार संख्या असलेल्या धायरी - सिंहगड रोड  परिसरात रखडलेल्या डी पी रस्त्यांणा प्रश्न  खडकवासला विधानसभा निवडणुकीत गाजणार असल्याचे चित्र पुढे आले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात  संतप्त  धायरी सिंहगडरोड करांनी मुंबईतील आज्ञाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करून  रखडलेल्या डीपी रस्त्यांच्या  प्रश्नासाठी जनजागृती सुरू केली आहे त्यामुळे सर्वंच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी धायरीकरांची समजूत घालण्यासाठी भेटी गाठी सुरू केल्या आहेत.

प्रशासन निवडणुकी 

प्रक्रियेत गुंतले आहे तसेच आचारसंहिता सुरू असलेल्याने अधिकारी या बाबत बोलण्यास तयार नाहीत.रखडलेल्या डीपी रस्त्यासाठी जनजागृती करण्यासाठी आज  शेकडो संतप्त धायरीकरांनी  जोरदार घोषणाबाजी करत बैठक घेतली.

यावेळी बोलताना आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, कोट्यवधीचा चुराडा होऊनही डीपी रस्ते कागदावरच आहेत.धायरी गावासह मुख्य सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.‌रोजच्या वाहतूक कोंडीने धायरीकरांसह परिसरातील नागरिकांचे हाल सुरू आहेत.

युवा कार्यकर्ते सनी गजानन रायकर म्हणाले,जमीन ताब्यात नसतानाही सिंहगड रोड ते धायरी सावित्रीगार्डन डी पी रोडसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला. चारशे मीटरही रस्ता केला नाही.

निलेश रमेश दमिष्टे म्हणाले, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तसेच  विकास आराखड्यातील पर्यायी रस्त्याची कामे करण्यासाठी  प्रशासनाकडेवेळोवेळी पाठपुरावा करूनही २८ वर्षांत दखल घेतली नाही . त्यामुळे दररोज  प्रचंड वाहतूक कोंडीचा फटका  शालेय विद्यार्थ्यांसह रुग्ण , कामगारांना बसत आहे.

महिला बचत गटांच्या अध्यक्षा भाग्यश्री विकास कामठे म्हणाल्या,गेल्या चार पाच वर्षांत या भागात लोकसंख्या,   वाहनांची  अनेक पटींनी वाढली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यासह गावातील रस्ते अपुरे पडत आहेत . वाहतूक कोंडीमुळे नागरीकांचा प्रवास असुरक्षित बनला आहे. घराबाहेर पडलेले विद्यार्थी, नागरिक सुखरूप परत घरी येण्याची चिंता रोजच सतावत आहे.

------------

पोलिस,पलिका यंत्रणा चिरीमिरीत मग्न: 

 वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पुरेसे पोलिस, होमगार्ड, वाहतूक वार्डन नसल्याने तसेच सिग्नल बंद आहेत. अतिक्रमणे वाढल्याने 

वाहतूक कोलमडली आहे. असे असताना अतिक्रमणे हटविण्या ऐवजी पोलिस, पालिका यंत्रणा चिरीमिरीत मग्न असल्याचे गंभीर चित्र सिंहगड ,धायरी-  नऱ्हे रस्त्यासह सर्वत्र आहे.

------

धायरी गाव रस्त्यासह धायरी-  नऱ्हे,

नांदेड फाट्या पासून नांदेड सिटी गेट ,लगड मळा ते धायरी फाट्या पर्यंतवाहतूक कोंडीची समस्या सर्वात गंभीर बनली आहे.

प्रशासनाने धायरी गावात ४ डीपी रस्त्यांचे नियोजन हे २८ वर्षांपूर्वी केले आहे. मात्र याबाबत कोणतीही हालचाल करण्यात येत नाही. 

काही ठिकाणी अर्धवट भूसंपादन करण्यातआले आहे. तसेच डीपी रस्ते जागेवरती अस्तित्वात नसताना पालिकेचे अधिकारी बांधकामव्यवसायिकांना परवानगी देत आहे.डीपी रस्त्यांच्या समस्येसंदर्भात पालिका प्रशासन, राज्य शासन तसेच राष्ट्रपती पंतप्रधानांना पत्रे पाठवून  प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने धायरीकर संतप्त झाले आहे.

--------

Post a Comment

Previous Post Next Post