ललित पाटील प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेले पाच पोलीस कर्मचारी पुन्हा सेवेत

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करी करणारा ललित पाटील पोलिसांचा बंदोबस्त असताना पळून गेला. पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याने पाटीलला पळून जाण्यास मदत झाल्याच्या आरोपावरून पोलीस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे, पोलीस हवालदार रमेश जनार्दन काळे, नाथाराम भारत काळे, दिगंबर विजय चंदनशिव आणि अमित सुरेश जाधव यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं.

त्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) येथे धाव घेतली. सुनावणीअखेर त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना पुन्हा एकदा पुणे पोलीस दलात समावेश करण्यात आला आहे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियंत्रण कक्ष आणि पोलीस मुख्यालय या ठिकाणी त्यांची नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post