प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :अकरा वर्षाच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी शाळेतील शिक्षकावर नुकताच गुन्हा दाखल केला. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी शुक्रवारी स्वारगेट पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. एफआयआरनुसार, २७ सप्टेंबर रोजी झालेल्या संगणक वर्गात शर्ट न घातल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी शिक्षकाने तक्रारदाराच्या मुलाला बेदम मारहाण केली.
मारहाणीनंतर विद्यार्थ्याच्या नाकातून आणि कानातून रक्त येत असल्याचा आरोप आहे.पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 115 (2) आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, 2015 च्या कलम 75 नुसार गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी चौकशी सुरू असून आरोपी शिक्षकाला नोटीस बजावण्यात आली आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.