प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- जवाहरनगर येथील जमीर शेख (वय 34.रा.जमादार कॉलनी.पाटे वाले) याचा शुक्रवार (04) रोजी सकाळी साडे आठ ते पावणे नऊच्या सुमारास रुकडी स्थानकाच्या आसपास चालत्या रेल्वेतुन पडल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला.या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना समजताच रेल्वे पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
अधिक माहिती अशी की,यातील मयत हा जवाहरनगर येथील जमादार कॉलनीत आपल्या कुंटुबिया समवेत रहात असून त्यांचा उद्यमनगर येथे कमान पाटे तयार करण्याचा कारखाना आहे.जमीर हा आज सकाळी सांगली येथे कामानिमित्त कोल्हापुरातुन कोयना एक्सप्रेसने जात असताना रुकडी स्थानकाच्या आसपास चालत्या रेल्वेतुन पडल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची माहिती मिळाली.त्यांच्या पश्च्यात आई, वडील ,पत्नी आणि दोन लहान मुले आहेत.