सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली-२० मधील वादग्रस्त दस्त नोंदणीची चौकशी करण्याची मागणी

लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हा निबंधकांना निवेदन

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली-२० मध्ये रेरा कायद्याची पायमल्ली करून झालेल्या दस्त नोंदणीची चौकशी करण्याची मागणी लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहराध्यक्ष संजय आल्हाट यांनी आज,दि.८ ऑक्टोबर रोजी सह जिल्हा निबंधक ( मुद्रांक जिल्हाधिकारी ) यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

.बांधकामाच्या ग्रामपंचायत परवानग्या असलेल्या दस्तांची सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली -२० मध्ये नोंदणी करण्यात आल्या.त्यातून महा रेरा कायद्याची पायमल्ली करण्यात आली.१५ ऑगस्ट २०२४ पर्यंत आणि नंतरही येथील अधिकाऱ्याने दस्त नोंदणी चालू ठेवली.हे दस्त सर्व आवश्यक बांधकाम परवानग्या घेऊन केलेले आहेत का आणि कबुली जबाबासाठी राखून ठेवले आहेत का याची चौकशी व्हावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित उपनिबंधकाचा पदभार काढून घेण्यात यावा,अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तसेच पुणे जिल्हाधिकारी यांनाही या निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे.  



Post a Comment

Previous Post Next Post