वंचित बहुजन युवा आघाडीचे पुण्यात हलगी बजाव आंदोलन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर कार्यकारिणीच्या वतीने मंगळवारी(1ऑक्टोबर) रोजी भीमनगर मुंढवा येथील नागरिकांच्या घरांवर बेकायदेशीररीत्या पाटबंधारे विभागाने घर खाली करण्याची नोटीस लावली. तसेच तेथील शिर्के बिल्डरच्या फायद्यासाठी नागरिकांना बेघर करण्याचे काम सुरू असल्याने वंचित बहुजन युवा आघाडीने पाटबंधारे विभागासमोर हलगी बजाव आंदोलन केले. संबधित अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी, सुशोभीकरणाचे काम ताबडतोब थांबवण्यासाठी आणि नागरिकांना यातून दिलासा मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले.


या वेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, युवा आघाडी शहराध्यक्ष सोमनाथ पानगावे, सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहराध्यक्ष चैतन्य इंगळे, शहर महासचिव विश्वास गदादे, शुभम चव्हाण, शहर उपाध्यक्ष अजित वाघमारे, नितीन मस्के, स्वप्निल वाघमारे, पोर्णिमा ओव्हाळ, महिला शहर सचिव सविता चाबुकस्वार , निरंजनाताई सोनवणे, सुनील धेंडे, लखन कांबळे, सुमित हातागळे, मिलिंद सरवदे, चंद्रकांत कांबळे, धर्मराज लांडगे, सविता चाबुकस्वार, रफिक शेख, ओमकार कांबळे, अभिजीत बनसोडे, शुभम आल्हाट, प्रज्योत गायकवाड, सलीम शेख, अरुण इंगळे, श्रीकांत चौगुले, उमेश साळुंखे, राजा ढाले, जॉर्ज मदनकर, रोहन वाघमारे, मंगल कसबे, नीता मोरे, अर्चना कांबळे, जयश्री मोरे, स्नेहा कसबे, प्रियंका टेकाळे, तुषार कसबे, चंद्रकांत कांबळे, अर्जुन भिसे, अजय वाघमारे, प्रवीण बागुल, नूर शेख, सोमनाथ लोंढे, सरस्वती कसबे, अभिमन्यू सूर्यवंशी, पितांबर धिवार, परमेश्वर सनादे, प्रा.बी.पी.सावळे, दादासाहेब गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post