श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड्. पेठ वडगाव येथे दांडिया कार्यक्रम संपन्न

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड्. पेठ वडगाव येथे दि. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी शुक्रवारी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त दांडिया कार्यक्रम संपन्न झाला. दांडिया कार्यक्रमाचे पूर्वनियोजन व आयोजन प्राचार्या डॉ. निर्मळे आर.एल. यांनी केले होते.

 त्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सावंत ए.पी. व सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व द्वितीय वर्षातील विद्यार्थी यांनी सर्व सहकार्य केले. द्वितीय वर्षातील सर्व छात्राध्यापकांनी  दांडियासाठी आवश्यक पारंपारिक वेशभूषेमध्ये उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला. पारंपारिक व रंगीबेरंगी वेशभूषांमध्ये द्वितीय वर्षातील सर्व छात्राध्यापिकांनी आनंदाने पारंपारिक व दांडिया नृत्य सादर करून नवरात्र उत्सव साजरा केला. या पारंपारिक कार्यक्रमांमध्ये प्राचार्या डॉ. निर्मळे मॅडम सहा. प्रा. शिरतोडे मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख सहा.प्रा. सावंत मॅडम, सहा.प्रा.सोरटे सर, सहा.प्रा.डॉ.पवार मॅडम, ग्रंथपाल चौगुले मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी, द्वितीय वर्षातील छात्राध्यापक यांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला. कॉलेजच्या प्रांगणामध्ये हा महोत्सव संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post