प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.) पेठ वडगाव येथे जागतिक शिक्षक दिनानिमित्त दिं.५ ऑक्टोबर २०२४ रोजी महाविद्यालयामध्ये बी.एड्.प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून प्राचार्य डॉ. पाटील व्ही.आर.(प्राचार्य यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कोडोली) लाभले होते.त्यांनी ' *शिक्षक काल,आज व उद्या*' या विषयावर व्याख्यान दिले. आपल्या विषयामध्ये त्यांनी व कालचा शिक्षक कसा होता? आजचा शिक्षक कसा आहे?यांची तुलना करून भविष्य काळातील शिक्षक कसा असावा? याविषयी विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शन केले. त्यासाठी त्यांनी व्यवहारातील अनेक उदाहरणे व दाखले दिले.आजचा शिक्षक शिक्षक पेशामध्ये पारंगत व आधुनिक असावा.त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ.निर्मळे आर. एल. मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष माननीय विजयसिंह मानेसाहेब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमासाठी अक्षय शिपुरे यांनी सूत्रसंचालन व निवेदिता पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वर्ग सहा.प्रा. शिरतोडे व्ही.एल., सहा.प्रा. डॉ.पवार ए. आर. , सहा.प्रा.सोरटे.एस.के., सहा.प्रा. सावंत ए.पी., ग्रंथपाल चौगुले एस.एस. तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचे छात्राध्यापक, छात्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.