प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षक प्रसारक मंडळ अंबप , संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन ,(बी.एड) पेठ वडगाव . या महाविद्यालयामध्ये मंगळवार दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 रोजी डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 14 ते19 ऑक्टोबर पर्यंत वाचन सप्ताह साजरा करण्यात आला.
वाचन सप्ताहाच्या अंतर्गत महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये काव्यमैफिल, पुस्तक चर्चा, कथाकथन उस्फूर्त भाषण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, तरुणाईमधील व्यसनाधीनता इत्यादी विषयावरती पूर्ण आठवडाभर उपक्रम घेण्यात आले. प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवला. दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी उत्स्फूर्त भाषण व वाचनाचे महत्त्व असा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक बर्गे एस. बी. सर (महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय मार्केट यार्ड ) हे लाभले होते .तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निर्मळे आर. एल. मॅडम यांनी भूषविले होते.
या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वर्ग ,द्वितीय वर्षातील छात्राध्यापक उपस्थित होते. सर्व द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापकांनी या उपक्रमांमध्ये आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत कार्यक्रम संपन्न केला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी काव्यमैफिल, पुस्तक चर्चा, कथाकथन याही उपक्रमामध्ये आपला उस्फूर्त प्रतिसाद नोंदविला. शनिवारी 19 ऑक्टोबर रोजी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले तसेच उस्फुर्त भाषण याही उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवून या उपक्रमाचा आनंद घेतला.
या सर्व उपक्रमासाठी संस्थाअध्यक्ष मा.विजयसिंह माने साहेब यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. निर्मळे आर.एल. मॅडम होत्या तसेच सर्व प्राध्यापक वृंद, ग्रंथपाल, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाने वाचन सप्ताहाची सांगता झाली.
.